Tuesday 5 July 2016

असा केला अभ्यास

📚🏡📚🏡📚🏡📚🏡📚🏡

*🔹माझी शाळा माझे उपक्रम*
*🔸ध्यास आमुचा गुणवत्ता*

*📕असा केला अभ्यास*-
*🔸इयत्ता* -दुसरी
*🔹विषय*-गणित

*🔸विविध प्रकारे संख्या समजणे*.

*🔹संख्येचे दृढीकरण*-

*🔸साहित्य*-
दशक गठ्ठा,सुट्या काड्या,संख्या कार्ड,
मण्यांची माळ

*🔅कृती🔅*-

♦एक- एक विद्यार्थ्याला बोलवले,
त्याला कोणतीही एक संख्या सांगितली ,
ती संख्या विद्यार्थ्यांने,
🔸दशक गठ्ठा व सुट्या काड्या(प्रतिके)
वापरुन दाखवली.

🔹सांगितलेल्या संख्येचे संख्याकार्ड शोधून दाखवले,

🔸कार्डावरील संख्येचे दशक-एकक रुपात वाचन केले,

🔹संख्येतील दशकाची किंमत सांगितली,

🔸ती संख्या मण्यांच्या माळेवर देखिल दाखवली.

🔹अशा प्रकारे एक संख्या अनेक प्रकारे विद्यार्थ्यांना दाखवता आली तर संख्येचे दृढीकरण होण्यास मदत होते.
संख्या मनात पक्की ठसते.

🔸ह्या पध्दतीने रोज विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला जातोय.
*--------------------------------*
विद्यार्थ्यांना खूप मजा वाटली,अभ्यासाचा ताण जाणवला नाही.पुन्हा-पुन्हा असा अभ्यास करण्याची मागणी करु लागले.
*-----------------------------------*

*✍🏻शब्दांकन*-
सौ.जया नेरे(पाटील)
जि.प.केंद्रशाळा,भालेर
ता.जि.नंदुरबार

📚🏡📚🏡📚🏡📚🏡📚🏡

No comments:

Post a Comment