Tuesday 26 July 2016

इतरांच्या महत्वाच्या पोस्ट

🌷 ई-लर्निंग क्लासरूम मार्गदर्शन लेखमाला 8 🌷
       पहिल्या लेखात सांगितल्या प्रमाणे प्रोजेक्टर नंतर चौथी महत्वाची वस्तु आहे
सीलिंग माऊंट किट (Ceiling mount kit). तर याच्या बादल आपण माहिती घेऊया.
सीलिंग माऊंट किट (Ceiling mount kit) – आपण प्रोजेक्टर घेतल्यानंतर तो टेबल वर ठेऊन दखाऊ शकतो. पण टेबल वर प्रोजेक्टर ठेवल्यामुळे त्याचे नुकसान होऊ शकते. एकतर प्रोजेक्टर ची लेन्स व बल्ब हे  काचेचे असतात त्याना धक्का लागू शकतो, किंवा पडला तर फुटू शकतो. आपण वर्गावर नसताना मुले गोंधळ करून तिला हात लावायला जाऊन प्रोजेक्टर पाडू शकतात. म्हणून प्रोजेक्टर टेबल वर न ठेवता तो फॅन सारखा वरती छताला लटकून बसवतात, त्यासाठी एक स्टँड मिळतो त्याला सीलिंग माऊंट किट म्हणतात. हे बाजारात प्रोजेक्टर च्या दुकानात विकत मिळते किंवा ते तुम्ही ऑनलाइन ही मागऊ शकता. ह्या सीलिंग माऊंट किट च खालचा भाग कुठल्याही प्रोजेक्टरला स्क्रू ने बसतो व वरचा भाग हा छताला स्क्रू ने बसवता येतो. वर छताला लागणारे स्क्रू हे फास्टनर (Fastner) असतात ते प्रोजेक्टर चे वजन सहज पेलू शकतात हे स्क्रू भिंतीत गेल्यावर फाकतात त्यामुळे फिट बसतात. असे फास्टनर स्क्रू आपण आपल्या घरात फन साथी हुक नसेल तर तो हुक बसवण्यासाठी ही करतात. सीलिंग माऊंट किट आणल्या नंतर ते एखाद्या इलेक्ट्रिशियनला  बोलवा, स्क्रू बसवण्यासाठी ड्रिल करावे लागेल. तुम्ही स्वत: प्रोजेक्टर च खालचा भाग सीलिंग माऊंट किट ल बसवू शकता. वरचा भाग बसवताना अगोदर तिथे स्टँड लावून प्रोजेक्टर चालू करून पहा, स्क्रीन आपल्याला हवी तशी पडते का, आपल्याला पाहिजे तसे अंतर ठेऊन मगच वरचा स्टँड ठेऊन छतावर पेन ने खूण करून मगच इलेक्ट्रिशियनला ड्रिल करायला सांगा. अंतरामधे थोडा फरक पडला तरी चालतो तो आपण प्रोजेक्टर सेटिंग करून अॅडजस्ट करू शकतो. आणि प्रोजेक्टर च खालचा भाग ही लूस करून अॅडजस्ट करू शकतो. आता ह्या सीलिंग माऊंट किटला प्रोजेक्टर उलटा टांगला जातो त्यामुळे आपली स्क्रीन उलटी दिसते तर ही स्क्रीन अॅडजस्ट करण्यासाठी प्रोजेक्टर सेटटिंग मध्ये जाऊन फ्रंट सीलिंग हा ऑप्शन निवडा. मग एससीआरआरएन सरळ होईल. प्रोजेक्टरचे manual बघून तुमी हे करू शकता, किंवा Epson सारख्या कंपनी चे इंजीनियर प्रोजेक्टर फिटिंग च्या वेळेस बोलवा ते मोफत येतात. सीलिंग माऊंट किट हे बाजारात 1500 ते 1700 रुपयात मिळते.
सीलिंग माऊंट किटचा फोटो खाली दिला आहे.
सौजन्य – Synapse E-Learning, Solapur
Mobile no. 7038962705, 8446096789
Website - synapse-elearning.webs.com
E-mail- synapse.elearning@gmail.com
वेबसाइट अडड्रेस अगोदर www किंवा http टाकू नका. अडड्रेस बार मध्ये डायरेक्ट टाइप करा किंवा कॉपी पेस्ट करा.  ई-लर्निंग क्लासरूम विषयी कोणतीही शंका असेल माहिती हवी असेल तर वरील मोबाइल नंबर वर संपर्क करा. मोफत मार्गदर्शन मिळेल. धन्यवाद 🌷
श्रीपाद सुरवसे सर, श्री दत्त प्रशाला, सोलापूर, मोबाइल न.

No comments:

Post a Comment